कोण होते शिवाजी ?
महाराष्ट्राची
शान शिवाजी, मावळचा
अभिमान शिवाजी
स्वराज्याचे
गान शिवाजी , मुघलांची
धूळदान शिवाजी
रयतेचा कैवार शिवाजी, समतेची
तलवार शिवाजी
स्वधर्माचा
यल्गार शिवाजी , दुजनांचा संहार
शिवाजी
स्वकीयांचा
तो वर्म शिवाजी,
माणुसकिचा धर्म शिवाजी
,
कर्त्यांचा
सत्कर्म शिवाजी , सह्याद्रीचा मर्म
शिवाजी
नसानसातील रक्त शिवाजी
, शिव शंभोचा भक्त
शिवाजी
माझ्यातून अविभक्त शिवाजी , आम्ही
मानतो फक्त शिवाजी
गड किल्ल्यांचा श्वास शिवाजी
, पराक्रमाची कास शिवाजी
युक्तीवर विश्वास शिवाजी , ध्येयाचा
तो ध्यास शिवाजी
न्यायाची ही आग
शिवाजी , अन्यायचा राग शिवाजी
,
दख्खनचा तो वाघ
शिवाजी , निस्वार्थी हा त्याग
शिवाजी ,
कर्तुत्वाची
धग शिवाजी , तुमची
आमची रग शिवाजी
प्रेरणेने बघ शिवाजी
, स्वतः मधेच तू
जग शिवाजी