Monday, July 5, 2021

धीर सोडू नको

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्र मैत्रिणीसाठी ही कविता !

आपण संघर्ष करत असलो तरी त्याच यश हे परिक्षेच्याच निकालाशी संलग्न आहे असे नाही.

वैचारिक कक्षा रुंदवणे,सर्वसमावेशकता येणे,तर्कसंगत मत मांडणे,डोळसपणे नाण्याच्या दोन बाजू पाहणे ही देखील याचीच फलश्रुती आहे.

आपल्याला मिळालेला अनुभव हेच आपला यश माना.अपयश आल्यास ध्येय सध्यातेचा मार्ग बदला पण मार्ग सोडून टोकाचे पाऊल उचलू नका.तुम्हा सर्वांना आणि स्वप्नीलला ही कविता अर्पण ! 


धीर सोडू नको


मेहनतीने मांडलेला डाव,अर्ध्यावरती मोडू नको

प्रसंग बाका आहे मित्रा,पण तू धीर सोडू नको


स्वप्न उराशी बाळगून,सोडला तू रे गाव

परिस्थितीशी झुंजून,सोसले टाकीचे घाव 

कर्तृत्वाने लिहिलेली गोष्ट,अशी हाताने खोडू नको 

प्रसंग बाका आहे मित्रा, पण तू धीर सोडू नको


बापाच्या डोळ्यातली काळजी,आईची वेडी माया

तुझ्यासाठी चंदना परी झिजवली त्यांनी काया

आशेची ज्योत मालवून,नाते नैराश्याशी 

जोडू नको

प्रसंग बाका आहे मित्रा,पण तू धीर सोडू नको


रहा उभा रोखून नजर अन्यायाकडे थेट 

आण बळ मनगटात घे आव्हानांची भेट

नियतीने केलेल्या अन्यायाला कवटाळून रडू नको 

प्रसंग बाका आहे मित्रा,पण तू धीर सोडू नको


भारत (हिमांशू टेंभेकर)

Saturday, June 26, 2021

राजर्षीं

 *अंगिकारून राजर्षींच्या नीती,

सर्वांगीण विकासाचे होऊ सारथी !* 


स्पष्टीकरण - 

प्लेटो ह्या ग्रीक विचारतज्ञाने इसवीसन पूर्व ५ व्या शतकात फिलॉसॉफेर किंग ही संकल्पना मांडली.ही व्यक्तिरेखा म्हणजे ज्ञानाचा चाहता,सत्याचा कैवार करणारा,प्रजेचे हित पाहणारा राजा होय.हे सर्व गुण शाहू महाराजांमध्ये दिसून येतात.

चाणक्य नीती मधील तत्वज्ञानी राजा आणि 

समर्थ रामदास श्रीमानयोगी 

ही बिरुद शिवाजी महाराज आणि नंतर शाहू महाराज यांच्या स्वभावगुणांशी मिळत्याजुळती आहे.ज्यात नीतिशास्त्र हे विकासाचे साधन आणि राजनीती हा पाया मानून राजांनी कार्य केले.त्याच बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकास करणयासाठी राज्यांचा आदर्श घेईन सारथी ही संस्था काम करणार आहे.त्यांचे क्रांतिकारी आणि समानतावादी विचारांना अमलात आणून उक्ती आणि कृतीत काही फरक नसल्याचे द्योतक प्रशासन असायला हवे.

अंत्योदय वर भर देऊन दुर्बलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी संस्थेद्वारे राबवलेले लोकशाही जनप्रतिनिधी आणि सहकार चळवळ उभी करून आपल्या द्रष्टेपणाचे दाखले त्यांनी दिले.सर्वांगीण विकास हा केवळ शैक्षणिक व राजकीय न ठेवता तो खेळांपर्यंत आणि उद्योगांपर्यंत नेण्याचे काम राजांनी केले. उदा.मल्लविद्या,चित्रकला,नाट्य फोटोग्राफी यांना प्रोत्साहन देण्यात आले.

 त्यामूळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून बहुजन समाजाला न्याय देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. तरच समान आणि समावेशक विकासाची ही दूर होईल.कारण समस्या कितीही मोठी असली तरी सारथ्य कुशल असल्यास कोणत्याही संकटावर मात शक्य आहे.आणि हाच तो ज्ञान मार्ग ज्यात अर्जुनाचे सारथ्य करताना कृष्ण म्हणतो

न धरी शस्त्र करी मी गोष्टी संगें युक्तीच्या चार !!!


- भारत (हिमांशू टेंभेकर) 

Saturday, June 19, 2021

बापपण


मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच मी पण गमवाव लागत ,

फक्त जन्म दिल्याने बापपण येत नाही, ते कमवाव लागत ! 


कष्टाने खेचवा लागतो संसाराचा गाडा ,

मुकाट्यानेच प्यावा लागतो दुखाचा काढा ,

मनातल्या अस्थिरतेच वादळ आतल्या-आतच शमवाव लागत ,

फक्त जन्म दिल्याने बापपण येत नाही,ते कमवाव लागत ! 


खंबीरपणे उभे राहून कुटुंबाचा आधार व्हावा लागतो,

सगळ्यांप्रति कर्तव्याचा भार वहावा लागतो

भागत नसेल तरीही थोड्यातच जमवाव लागत !

फक्त जन्म दिल्याने बापपण येत नाही ते कमवाव लागत ! 

 

भारत (हिमांशू)

Tuesday, June 1, 2021

माझी वाट

ते माझे झाले होते,भेटताच क्षणी पण

मी तसा त्यांचा कधीही झालोच नाही 


ते अव्यक्त असून मजला,जरी सर्व कळाले होते

व्यक्त होऊन का त्यांना मी कळलोच नाही ? 


काटेरी वाटेवरती एकलाच चालत गेलो

तरी थकूनी असा माघारी मी वळलोच नाही


ओथंबूनी आलो मनाने ,जरी मी प्रत्येक ऋतूला

मनसोक्त तुझ्यापुढे मी कधी कोसळलोच नाही


ठेचाळल्या पायांना, उसंत मिळाली थोडीच

ध्येयाच्या मार्गावर मी अडखळलोच नाही 


बंड करून मनाने,कित्येक उठवल्या ज्वाळा

त्या स्थंडीलातही मी पुरता जळलोच नाही 


सारे प्रकाशित करण्या उगवला मित्र तो जेव्हा 

मी विझलो होतो तेव्हा,मग उजळलोच नाही 




Sunday, May 23, 2021

विश्वास

 ध्येय अजून गाठायचं,

मनात त्याचाच ध्यास ठेव !


खडतर असला मार्ग जरी,

इच्छाशक्ती खास ठेव !


यश मिळेल तुला,

हाती मेहनतीची कास ठेव !


नियतीच्या घोड्यावर तू

कर्तृत्वाचा फास ठेव !

 

मोठी लढाई बाकी आहे,

वाचवून थोडे श्वास ठेव !


हे नकारत्मक चित्र पालटेल,

तू फक्त विश्वास ठेव !!!


- भारत (हिमांशू टेंभेकर)

Friday, May 21, 2021

आयुष्याचा चहा

 आयुष्याचा चहा


सुरू होता नेहमीचा गोंधळ 

भोवती जगणाऱ्यांची गर्दी

तरी एकलकोंडा झालो होतो

त्यात जुना मित्र भेटला दर्दी


होऊनी मग गळा भेट

धरली वाट चहाची थेट 

वाफाळल्या गोष्टीसंगे

शब्द अन घोटाची मेट


आयुष्याच्या गप्पानंतर मग 

विषय चहावर वळला 

उभ्या प्रवासाचा मतितार्थ

कटिंग कपाने उलगडला 


कडवटपणा उकाळून दुःखाचा

आनंदाची मग द्यावी गोडी 

स्वाभिमानाच्या आल्या बरोबर

सकरात्मकतेची इलायची थोडी 


छोट्या कपात सामावून

आपण मात्र मोठं व्हावं 

आपल्या फक्त अस्तित्वाने 

लोकांच्या चेहऱ्यावर स्मित यावं 


भारत (हिमांशू टेंभेकर)

Sunday, May 16, 2021

पाऊस

पाऊस कोसळतोय बेभान आज,

आतही आणि बाहेरही 


वादळ जोमाने उठलंय खास,

आतही आणि बाहेरही 


विश्वासाचा वृक्ष कोलमडून पडलाय ,

आतही आणि बाहेरही


निसरड्या झाल्याय काही जागा,

आतही आणि बाहेरही 


हरवल्या हिरवळीत काही वाटा ,

आतही आणि बाहेरही 


थांबले आहेत क्षण सारे ,

आतही आणि बाहेरही


होईल निरभ्र आकाश जसे,

आतही आणि बाहेरही 


इंद्रधनू उमटेल पुन्हा,

आतही आणि बाहेरही !


नवीन पालवी फुटेल आता, 

आतही आणि बाहेरही !!!


भारत

Sunday, May 9, 2021

सफर

तुफानोसे भिड़ जाने की 

करली मनमें अब तैयारी है

छूट गए है अपने पीछे 

मगर ये सफर जारी है 


आज धधग उठी है अग्नि

कल की जो चिंगारी है 

जिसने मनमे ठान लिया हो 

वो संकटपे भी भारी है 


दुविधाके मदमस्त गज पर 

दृढ़ संकल्प की सवारी है

सुखी हुआ वो जीवन पथपर

जिसकी दुःखसे यारी है 


टूटके भी लड़ जाने की

दिल मे ये जो खुमारी है

प्रकाश देना अंधकार में 

ये दिप की जिम्मेदारी है 

- भारत ( हिमांशू टेंभेकर)