Sunday, September 27, 2015

पुढल्या वर्षी लवकर या !!!

सुटला ठाव ये ना ,तुटला गाव ये ना
तिच्ल्या काळजाचा सलतो सुवास ये ना
पाणावून आले डोळे पुन्हा परतून ये ना!!!

ये लवकर पुढल्या वर्षी तास आपण भेटू माघ महिन्यात पण कळत नाय कोणत्या तोंडाने तुला घ्यायला येऊ पुढच्या वर्षी ?
कंटाळला असशील ना अश्लील गाण्यांना?
समाज द्यावी वाटते ना मोठेपणाचा बडेजाव करणाऱ्या मंडळांना ?
सणाला फक्त दारू पिण्याचा बहाणा समजणाऱ्या नादान भक्तांना समजावून सांगाव वाटतना?
तू जाताना विघ्न आणि दुर्बुद्धी घेऊन जाईल म्हणतोस पण तुझ्या जाण्याच्या रस्त्यावरच कचरा आणि तमाशा पाहून वाटत हि लोक दुर्बुद्धी पुन्हा हिसकावून घेतात तुझ्याकडून खरय का रे?
ह्यावेळी पण अनेक मंडळानी विधेयक कार्ये केली,निर्माल्याचा सदुपयोग झाला बर ! आणि बाकीच्यांचा धिंगाणा तर तसाच होता कधीतरी यांना गणेश उत्सवाचा खरा अर्थ कळेल का रे ?
टिळक भेटले तर तेही शरमिंदा होतील योजले काय चालेय काय?
असो देवा आम्ही प्रयत्न करत राहणार जो परंत मनात निश्चय ठाम आहे आणि अंगात त्राण आहे
जे भेटतील त्यांना समजावत राहू,दर वर्षी थोड थोड सुधरत आणि सुधारत जाऊ
अचानक तर सगळी परिस्थिती बदलणार नाही पण शब्द देतो अविरत कार्य करत राहू !
एक विनंती आहे छोटीशी तू पण थोड मनावर घे , भक्तांच्या मनात बदलाची एका ज्योती जागव
दरवेळीप्रमाणे संकटाना धावून ये ,सगळ्या चिंता हरून घे ,ह्या वर्षी प्रमाण पुढला वर्ष पण असच गाजव !!!!

Thursday, July 30, 2015

कोण होते शिवाजी ?

कोण होते शिवाजी ?

महाराष्ट्राची शान शिवाजी, मावळचा अभिमान शिवाजी
स्वराज्याचे गान शिवाजी , मुघलांची धूळदान शिवाजी                                                                              

रयतेचा कैवार शिवाजी, समतेची तलवार शिवाजी
स्वधर्माचा यल्गार शिवाजी , दुजनांचा संहार शिवाजी

स्वकीयांचा तो वर्म शिवाजी, माणुसकिचा धर्म शिवाजी ,
कर्त्यांचा सत्कर्म शिवाजी , सह्याद्रीचा मर्म शिवाजी

नसानसातील रक्त शिवाजी , शिव शंभोचा भक्त शिवाजी
माझ्यातून अविभक्त शिवाजी , आम्ही मानतो फक्त शिवाजी

गड किल्ल्यांचा श्वास शिवाजी , पराक्रमाची कास शिवाजी
युक्तीवर विश्वास शिवाजी , ध्येयाचा तो ध्यास शिवाजी

न्यायाची ही आग शिवाजी , अन्यायचा राग शिवाजी ,
दख्खनचा तो वाघ शिवाजी , निस्वार्थी हा त्याग शिवाजी ,

कर्तुत्वाची धग शिवाजी , तुमची आमची रग शिवाजी

प्रेरणेने बघ शिवाजी , स्वतः मधेच तू जग शिवाजी

Thursday, February 5, 2015

तुला सांगायचाच राहील
तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणात मी उभा आयुष्य जगून पाहिलं
नितळ प्रेमाच्या छायेत माझ अंतरंग पुरत न्हायल
हो पण शेवटी जाताना तुला सांगायचाच राहील

सदैव तुझीच साथ हातात तुझा हात
घर करून बसलीस तू एकाकी ह्या मनात
आज माझा श्वास तू निखळ हा विश्वास तू
ह्या जन्मीच काय पुढच्या जन्मीही देवाकडे तुला मागून पाहिलं
हो पण शेवटी जाताना तुला सांगायचच राहील

तुझ्या येण्याने एकाकी आयुष्यात आली बहार
तुझ्या निखळ सौंदर्याने झालो मी पुरता बेजार
दिवस रात्र ध्यानी मनी आता फक्त तुझाच विचार
निरभ्र आकाशात त्तुझ्या प्रितीच चांदण आज मी जागुन पाहिलं
हो पण शेवटी जाताना तुला सांगायचच राहील

मोर पिसासारखी हळुवार येते तुझी आठवण आता
निशब्द मी आणि अबोल तू जाता  जाता
मनाचा सांभाळला मी तोल स्वतःचा स्वतः
नयन काठावर लिहिलेलं हे प्रेम अश्रूंच्या ओघात अलगद वाहील  

हो पण शेवटी जाताना तुला सांगायचच राहील