तुला सांगायचाच राहील
तुझ्या सोबत घालवलेल्या
क्षणात मी उभा आयुष्य जगून पाहिलं
नितळ प्रेमाच्या छायेत
माझ अंतरंग पुरत न्हायल
हो पण शेवटी जाताना
तुला सांगायचाच राहील
सदैव तुझीच साथ हातात
तुझा हात
घर करून बसलीस तू एकाकी
ह्या मनात
आज माझा श्वास तू निखळ
हा विश्वास तू
ह्या जन्मीच काय पुढच्या
जन्मीही देवाकडे तुला मागून पाहिलं
हो पण शेवटी जाताना
तुला सांगायचच राहील
तुझ्या येण्याने एकाकी
आयुष्यात आली बहार
तुझ्या निखळ सौंदर्याने
झालो मी पुरता बेजार
दिवस रात्र ध्यानी
मनी आता फक्त तुझाच विचार
निरभ्र आकाशात त्तुझ्या
प्रितीच चांदण आज मी जागुन पाहिलं
हो पण शेवटी जाताना
तुला सांगायचच राहील
मोर पिसासारखी हळुवार
येते तुझी आठवण आता
निशब्द मी आणि अबोल
तू जाता जाता
मनाचा सांभाळला मी
तोल स्वतःचा स्वतः
नयन काठावर लिहिलेलं
हे प्रेम अश्रूंच्या ओघात अलगद वाहील
हो पण शेवटी जाताना
तुला सांगायचच राहील
No comments:
Post a Comment