सार्थकी लागलेला दिवस
रणरणत्या उन्हामध्ये भरदुपारी ३ वाजता ५ इंजिनीर जीवाची मुंबई करत होते आम्हाला पाहायचा होता चित्रपट पण असला तसला नाही मराठी होय तोच "डॉ.प्रकाश बाबा आमटे".
३ वाजेपासून आम्ही फिरत होतो आधी इटरनीटि,कोरम,R मॉल,वंडर मॉल सगळे धुंडाळले मराठी चित्रपट असल्याने मल्टीप्लेक्सवाल्यांनी १ किवा जास्तीत जास्त २ शो लावलेले पण सगळे हाउसफुल एकीकडे आनंद खूप होत होता पण आम्हाला बघायला मिळेल का नाही याची उत्कंठाही लागली होती.शेवटी सगळ्या अडचणींवर मत करून आपल्या ठाण्याच्या वंदना थेटर मध्ये ६.३० चा शो बघायला आम्ही गेलो लवकरच तेही हाउसफुल झाल.मी स्वत: आनंदवनात जाऊन आलो असल्याने माल सगळ्या मित्रांना हा चित्रपट दाखवायचाच होता.राष्ट्रगीत झाले आणि चित्रपट सुरु झाल्यापासून तर संपेपर्यंत टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता ! हिमालयाहुन उत्तुंग कर्तुत्वाची माणस कशी असतात आणि ते अडचणीवर मात करून कसल्याही प्रसिद्धीची आणि मानसन्मानाची अपेक्षा न करता कसे जगतात हे आपल्याला बघायला मिळेल.मला वैयक्तिकरित्या अनेक गोष्टींची प्रेरणा मिळाली अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळाली.आपल्याला मिळालेल्या गोष्टीत समाधानी कसे राहावे,इतरांसाठी जगताना काय काय त्याग करावे लागतात.डॉक्टर म्हणतात मी देवाला मानत नाही.पण मी देवाला मानतो आणि डॉक्टरनसारखी मंडळी पाहिल्यानंतर तो आहे ही खात्री झालीय.अशा निस्वार्थी लोकांमुळे जग चाललय.आजवर जनसेवा वेगवेगळ्या मार्गाने मी करतच आलोय पण आता जीवनाच उदिष्ट अजून स्पष्ट झाल.हा अभंग त्यांना सार्थपणे लागू होतो
"करुनिया जनसेवा जाहलो अभंग, नीतिवंत नीतिवंत तोचि पांडुरंग!!!
पिकत तिथ विकत नाही हे पण तितकेच खरे आपल्या लोकांना डॉक्टरांची किंमत फार उशिरा कळली आणि अजूनही ती पूर्णपणे कळाली अस वाटत नाही.आणि हो इतकी समजूतदार,समाधानी अर्धांगिनी मिळायलाही खूप मोठ भाग्य लागत आणि नाना पाटेकरांच्या अभिनयाबद्दल तर काही बोलायलाच नको ते खरेपणाने ते पात्र जगले आहेत ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा!
आधी हा चित्रपट बघायला गेलेल्या आणि बघायला जाणाऱ्या सगळ्या लोकांचे मी मनापासून अभिनंदन करतो."कारण एक गोष्ट मला कळाली चांगला चित्रपट पाहायला चांगलीच लोक येतात"सर्व प्रेक्षक चित्रपट संपल्यानंतर पडदा काला होईपर्यंत उभे राहून मानवंदना देत होते. संपूर्ण परिवाराने आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट!!

👌🏻
ReplyDelete