पोलादी छातीच्या देशा
काळ्या मातीच्या देशा
दुर्गट घाटांच्या देशा
वाहत्या पाटांच्या देशा
समर्थ बलिदानाच्या देशा
समर्पक ज्ञानाच्या देशा
शक्ती तलवारीच्या देशा
भक्ती अन वारीच्या देशा
सुरेल कवितांच्या देशा
जीवनदा सवितांच्या देशा
पुरोगामीत्वाच्या देशा
शिवस्वामीत्वाच्या देशा
नव स्वीकृतीच्या देशा
संपन्न संस्कृतीच्या देशा
हिरवळीतील वळणांच्या देशा
विस्तीर्ण पुळणांच्या देशा
सर्वगुण संपन्न राष्ट्र देशा
प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भारत(हिमांशू)