Sunday, January 21, 2024

राम आहे

अंधार चौहु कडे 

प्रकाश राम आहे 

कर्तुत्व झेप घेण्या 

आकाश राम आहे 


मनी बांधलेला 

ध्यास राम आहे

गर्व जाळण्याचा 

अभ्यास राम आहे 


ध्येयाचा साधलेला 

नेम राम आहे 

निस्वार्थी,निष्कलंक 

प्रेम राम आहे 


अनितीच्या मुळावरचा 

घाव राम आहे 

भवसागर पार करण्या

नाव राम आहे 


खडकास भेदणारे

मूळ राम आहे 

सत्याचे लागलेले 

खूळ राम आहे 


मनातल्या भयाला

अभय राम आहे 

विस्तारल्या जगाचा 

विलय राम आहे 


उन्हात डोलणाऱ्या 

कणसात राम आहे 

इतरत्र शोध व्यर्थ 

माणसात राम आहे 


भारत...(हिमांशु)