डोंबिवली पक्षीनिरीक्षण स्पर्धा २०१६
आदल्यादिवशीच सगळ्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या.प्रत्येकाने काही विशिष्ट ठिकाणी सकाळी ७ ला पोहचायचे आणि येणाऱ्या विद्यार्थी आणि बाकी स्पर्धकांना पक्शिनिरीक्षणात मदत करायची.लेकरा लहान होती धावपळीच्या जीवनातून वेळ काढून आज सगळी शाळेतली पाखर माळरानावरच्या खऱ्या पखरण भेट द्यायला आली होती.अंगभर स्वेटर घालून आणि टोप्या घालून त्यांचे गोजिरवाणे रूप अजून खुलले होते.विद्यार्थी येण्यास सुरवात झाली पण ते एकटे आले नाही तर सोबत पालकही आले मोबाईल आणि संगणकाच्या दुनियेतून बाहेर पडणारे आपले मुल पाहून त्यानाही खूप आनंद झाला असेल याची मला खात्री आहे.पण पक्ष्यांच्या बाबतीत पालकांचेही कुतूहल तेवढेच जागृत होते.
दादा तो बघ पक्षी !!! लगेच आम्ही तिकडे बघव हातातल्या कॅमेराने त्याला अलगत टिपावा त्यांना पुस्तकात तो दाखवावा आणि मग फोटोमध्ये दाखवावा तेव्हा चिमणी कावळ्या व्यतिरिक्त मिळालेले हे सगळे रंगीबेरंगी पक्षी पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातली ती "चमक" हेच माझ बक्षीस मला मिळाला.ह्यातूनच पुढची पर्यावरणरक्षक फौज निर्माण होईल हे मला कळाल.दंग मस्ती करणारी मुल आज शांततेत दबक्या पावलांनी चालली होती आणि पक्षीही बरेच जवळ येउन त्यांना दर्शन देत होते.त्यामुळे त्यांच्या मुखकमलावरचा हास्याचा आलेख अजून उंचावत होता हे पाहून आम्हालाही तितकाच समाधान लाभत होत.त्यात मी स्वतालाला बघत होतो माझ बालपण आणि रम्य भूतकाळ !!!
नंतरचा तास होता तो नोंदी जमा करायचा सगळे आपली नोंद वही घेऊन आले.दादा आम्ही २० पक्षी पहिले पण १० आम्हाला ओळखता आले नाही मग काय त्या संघाचा गोतावळा आजूबाजूला घेऊन त्यांच्या वर्णनानुसार पक्षी शोधायचा अतहस आम्ही पण पूर्ण केला.त्याचे डोके लाल ,पाठ काळी पंख निळे असे काही वर्णन करतात पक्ष्याच्या बारीकसारीक सवयी विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन पाहिल्या.तेव्हा आपल्या पुढच्या पिढीसाठी हा निसर्गाचा ठेवा वाचवणे आपले कर्तव्य आहे.म्हणून असे निसर्ग मेळावे आणि स्पर्धा ह्या सतत होत राहिल्या पाहिजे.त्यावेळी माझी आजी समोर असती तर कौतुकाने बोलली असती "विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा " !!
आयुष्यातला पहिला पूर्णपणे सूत्रसंचालन केलेला पहिला कार्यक्रम !!!
१७० प्रेक्षक पण कोणी वेगळ वाटत नव्हत.प्रेक्षकांमध्ये सगळे स्पर्धक कोणी लहान कोणी मोठे कोणी विद्यार्थी तर बाकी पालक ! थोडे ओळखीचे तर बहुतेक अनोळखी चेहरे पण एक समाधान होत कोणत्याच श्रोत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पडू द्यायचं नाही असा केलेला संकल्प पूर्णत्वास गेला.वक्ता बनून आपण प्रेक्षकांना मर्यादित काळासाठी खिळवू शकतो पण तुम्ही सूत्रसंचालन करत असताना वक्त्याबरोबर श्रोत्यांचा मित्र बनणे थोडेसे कठीण! असो न ठरवता आणि कोणतीही रंगीत तालीम न करता केलेला हा कार्यक्रम यशस्वी झाला ह्याचा आनंद मात्र मोठा! जितका कौतुक झाल त्यापेक्षा मिळालेल्या सूचना अमलात अनुम पुढे आणखी सुधारणा होईल याची ग्वाही देऊन मी लेखणीला पूर्णविराम देतो.
प्रथमेश,किरण,प्रशांतदादा,अजिंक्य,स्वप्नील,प्रतिक,विशाल तुमच्या शिवाय हे शक्य नव्हते खूप बोलायचे राहिले पण ह्याची भर पुढल्या वेळी काढीन हा वादा !!!बक्षीस घ्यायला येणारे संघ पाहून शाळेतल्या बक्षीस समारंभाची आठवण झाली मंच्याकडे जाताना वाजणारे नाशिक ढोलचे संगीत कानात गुणगुणू लागले.वा आनंद सोहळा !!! जिंकलेल्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि न जिंकलेल्याना अजून मेहनत करण्याचा सल्ला !!!

No comments:
Post a Comment