पाऊस कोसळतोय बेभान आज,
आतही आणि बाहेरही
वादळ जोमाने उठलंय खास,
आतही आणि बाहेरही
विश्वासाचा वृक्ष कोलमडून पडलाय ,
आतही आणि बाहेरही
निसरड्या झाल्याय काही जागा,
आतही आणि बाहेरही
हरवल्या हिरवळीत काही वाटा ,
आतही आणि बाहेरही
थांबले आहेत क्षण सारे ,
आतही आणि बाहेरही
होईल निरभ्र आकाश जसे,
आतही आणि बाहेरही
इंद्रधनू उमटेल पुन्हा,
आतही आणि बाहेरही !
नवीन पालवी फुटेल आता,
आतही आणि बाहेरही !!!
भारत
❤पाऊस आणि कविता 💫
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteअप्रतिम...वादळ आतही आणि बाहेरही....superb
ReplyDeleteधन्यवाद ! 💐
DeleteNice!!
ReplyDeleteखूप धन्यवाद !
Delete👌
ReplyDelete🤗
Deleteअप्रतिम भावा!!!
ReplyDeleteDhanywad !
Delete