Thursday, April 13, 2023

आंबेडकर म्हणजे ?

 आंबेडकर म्हणजे 

परीपूर्ण विद्याव्यासंग आहे 

आंबेडकर म्हणजे

घटनेचा मूलभुत अंग आहे 


आंबेडकर म्हणजे

स्थितप्रज्ञेतेची किनार आहे

आंबेडकर म्हणजे 

विरोधी बंडाची पुकार आहे 


आंबेडकर म्हणजे 

अचूक अस विश्लेषण आहे 

आंबेडकर म्हणजे

जाज्वल्य असे लेखन आहे 


आंबेडकर म्हणजे

ज्ञानाचा विश्वविजय आहे

आंबेडकर म्हणजे

समता संघर्षाचा उदय आहे


आंबेडकर म्हणजे

हक्काच्या न्यायाची हमी आहे 

आंबेडकर म्हणजेच 

मानवता जपणारा तू अन् मी आहे


भारत (हिमांशू)

No comments:

Post a Comment